Tik Tok वर पुन्हा गंडांतर, 22 जुलै पर्यंत उत्तर न दिल्यास बंदी लागणार

51

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सुप्रसिद्ध ऍप टिक टोकवर पुन्हा बॅन लागण्याची शक्यता आहे. या ऍपच्या माध्यमातून हिंदुस्थान विरोधी आणि अश्लील आशय पसरवला जातो असा आरोप या ऍपवर आहे. त्यामुळे न्यायालयाने 22 जुलै पर्यंत या ऍपच्या निर्मात्यांन उत्तर देण्यास सांगितले आहे. जर कंपनीने उत्तर न दिल्यास हे ऍप पुन्हा बंद होऊ शकतं.

इलेक्ट्रॉनिक आणि माहित्री तंत्रज्ञान मंत्रालयाच्या कायदा आणि इ-सुरक्षा विभागाने टिक टोक आणि हॅलो ऍपला नोटीस पाठवली आहे. तसेच 22 जुलै पर्यंत याचे उत्तरही मागितले आहे. हे दोन्ही ऍप चीनची कंपनी बाइटडान्सकडून चालवले जातात.

मंत्रालयाने कंपनीला 24 प्रश्न पाठवले आहेत. 22 जुलै पर्यंत त्यांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास त्यावर पुन्हा बंदी घातली जाणार आहे.

मंत्रालयाने विचारलेले महत्त्वाचे प्रश्न

  • वादग्रस्त आशयावर कसे लक्ष्य ठेवले जाते आणि अशा प्रकारचा आशय मिळाल्यास त्यावर काय कारवाई केली जाते?
  • अल्पवयीन युजर्ससाठी काय अटी आहेत?
  • युजर्सही माहिती कशाप्रकारे एकत्र केली जाते आणि ती कुठे कुठे वितरीत केली जाते?
  • हिंदुस्थानी युजर्जसचा डेटा चीनमध्येही स्टोर केला जातो का?
  • हिंदुस्थानी युजर्जचा डेटा कुठल्याही विदेशी सरकार किंवा तिसर्‍या संस्थेला विकले जाणार नाही याची हमी काय?
आपली प्रतिक्रिया द्या