बगलेतील केसांचा फोटो शेअर करत बॉलिवूड अभिनेत्री म्हणाली ‘मला ते आवडतात’, पोस्ट व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये झळकलेली लोकप्रिय अभिनेत्री तिलोत्तमा शोम (Tillotama Shome) ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. फोटो, व्हिडीओ शेअर करून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तिलोत्तमा हिने नुकताच एक वेगळाच फोटो शेअर केला असून यामुळे ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

तिलोत्तमा हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो चर्चेत येण्याचे कारण की तिलोत्तमा हिने बगलेतील केस दाखवत हा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने दिलेले कॅप्शनही सध्या चर्चेत आहे.

व्हायरल फोटोमध्ये तिलोत्तमा हिने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला आहे. या टी-शर्टवर क्षमाशील नाही, असे लिहिलेले आहे. या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये तिलोत्तमा हिने आपल्या बगलेतील केसांबाबत विधान केले आहे. शरिरावरील केसांबद्दल मी माफी मागणार नाही. कारण मला ते आवडतात. मी वॅक्स करते देखील आणि कधी-कधी नाही देखील, असे कॅप्शन तिने दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tillotama Shome (@tillotamashome)

तिलोत्तमा शोम हिने

‘राहगिर’, ‘मान्सून वेडिंग’, ‘चिंटू का बर्थडे’, ‘कडवी हवा’, ‘चिल्ड्रन ऑफ वॉर’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. नेटफ्लिक्सवरील आलेल्या ‘सर’ या चित्रपटात ती अखेरची दिसली होती. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर क्रिचिक सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.