
– कापराच्या सुगंधाने जिवाणू, विषाणू, लहान कीटक नष्ट होतात. त्यामुळे वातावरण शुद्ध राहते व आजार दूर राहतात.
– सर्दीचा त्रास होत असल्यास 3-4 कापूर एकत्र करून ते हुंगायचे. त्याने थोडा आराम मिळतो.
– कपाटात किंवा कपडे ठेवता अशा ठिकाणी कापूर ठेवावा. त्याने कपडय़ांना कुबट वास येत नाही.
– सर्दी, खोकल्याकरिता एका पातेल्यात गरम पाणी करून त्यामध्ये हा कापूर टाकावा आणि त्याची वाफ घ्यावी. आराम मिळतो.
– तोंडाच्या दुर्गंधीसाठीही कापूर उपयुक्त मानला जातो. कापूर व्यवस्थित श्वासावाटे आत घेतल्याने तोंडाला घाण वास येत असल्यास निघून जातो.
– मूठभर कापूर थोडासा तव्यावर तापवून ते एका रुमालात बांधून त्याचा शेक गळ्याला दिल्यास घसा बसला असेल तर बरा होतो.
– घरात डास जास्त असल्यास रात्री आपल्या सभोवती कापूर ठेवा, डास फिरकत नाहीत.
– कापूर अति जाळू नये. कारण अति धुराने डोळे झोंबतात, डोळ्यांना त्रास होऊ शकतो.
– गरम पाण्यात मीठ व बराच कापूर टाकून त्यात पाय बुडवून ठेवल्याने आराम मिळतो.
– तिळाच्या तेलात कापूर एकत्र करून ते तेल सांध्यांना लावावे. तिळाच्या तेलाच्या उग्र वासाचा त्रास होत नाही.
– कापूर खोबरेल तेलात एकत्र करून ते तेल केसांच्या मुळाला लावावे. दुसऱया दिवशी केस स्वच्छ धुवावेत. कोंडा कमी होतो.
– दाढ जास्त दुखत असल्यास कापराचा लहानसा खडा किडलेल्या दातात ठेवावा. तो आपोआप विरघळतो आणि आराम मिळतो. लाळ पोटात गेल्यास काही अपाय नाही.
– कापराचा रोज तीनवेळा सुवास घेतल्याने आपल्या नाकाची वास ओळखायची क्षमता वाढते.






























































