घरची साफसफाई टिप्स

 • रोजच्या रोज काही गोष्टींवरून हात फिरवला की, त्या वस्तू स्वच्छ होतात आणि घरही स्वच्छ राहते.
 • बाहेरून घरात आलेली व्यक्ती सोफ्यावर बसते. त्यासाठी दर चार दिवसांनी सोफ्यावरची चादर बदलावी.
 • उशांची कव्हर्सही गरम पाण्यात धुवायला हवी.
 • गाद्या, बिछाने आठवडय़ातून एकदा उन्हात ठेवायला हवेत.
 • स्वयंपाकघर कायम स्वच्छ ठेवा. स्वयंपाकघरातील ओटय़ाची सफाई गरम पाण्यात डिटर्जंट टाकून करायला हवी. ओटय़ावर कधीही पसारा ठेवू नका. स्वयंपाक करताना घेतलेल्या सगळ्या वस्तू पुन्हा काम झालं की जागेवर ठेवा. तुमचा ओटा स्वच्छ असेल तर तुमचं किचन स्वच्छ दिसतं.
 •   दर दोन आठवडय़ाने फ्रिजची सफाई व्हायला हवी. फ्रीजमधल्या वस्तू काढून फ्रीज साबणाच्या पाण्याने स्वच्छ करावा.
 •   बऱयाचदा अडगळीच्या ठिकाणी सफाई होत नाही. तिथे हात पोहोचत नसल्याने तिथे साफ करणे टाळतो. अशा वेळी घरातील काठीला कपडा ओला करून ती काठी अडगळीच्या ठिकाणी फिरवावी.
 •   आठवडय़ातून एकदा घरातील पंखा स्वच्छ करावा.
 •   पडद्यांवर बरीच धूळ जमा होत असते. त्यासाठी वरचेवर पडदेही धुवायला हवेत.
 •   सगळे घर एकाच दमात स्वच्छ न करता टप्प्याटप्प्याने करा.
 •   घरातील अनावश्यक गोष्टी काढून टाका. नको असलेल्या वस्तू देऊन टाका. त्याने अडगळ वाटणार नाही.

 

कोरोना सेंटर्स

 •   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल, कांदिवली (प.)
 •   के. बी. एच. भाभा हॉस्पिटल,
  कुर्ला (प.)
 •   राजावाडी हॉस्पिटल, घाटकोपर (पू.)
 •   नायर हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल.
 •   HE2IT बिल्डिंग, कलिना युनिव्हर्सिटी, सीएसटी रोड, सांताक्रुझ (पूर्व)
आपली प्रतिक्रिया द्या