कपडे धुताना त्यांचा रंग जातो…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 कपडे धुताना त्यांचा रंग जाऊ नये, म्हणून काही सोप्या टिप्स लक्षात ठेवाव्या. कपडय़ांचा रंग पक्का करण्यासाठी आणि तो इतर कपडय़ांना लागू नये म्हणून त्यांना थंड पाण्यात धुवावे. तसेच, कपडे धुण्याआधी ते मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवा.

 मशीनमध्ये किंवा हाताने कपडे धुताना ते नेहमी उलटे करा. नवीन गडद रंगाचे कपडे नेहमी इतर कपडय़ांपासून वेगळे धुवा. नाहीतर त्यांचा रंग दुसऱ्या कपडय़ांना लागू शकतो. कपडे कधीही थेट कडक उन्हात सुकवू नका.