बंदुकीच्या जोरावर लोकप्रतिनिधी पळवले, तृणमूलचा भाजपवर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोलकाता

मंगळवारी तृणमूल काँग्रेसचे तीन आमदार आणि 50 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बंगालमध्ये राजकीय भुकंप आला आहे. सहा नगरसेवकांना बंदुकीच्या जोरावर भाजपमध्ये प्रवेश दिला असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. तसेच भाजपमध्ये सामील झालेले बहुतांश नेते हे माकप आणि काँग्रेसचे आहे असा दावाही तृणमूलने केला आहे.

पश्चिम बंगालच्या तीन आमदारांनी भाजप प्रवेश केला आहे. त्यात तृणमूल आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार आहे. तसेच 50 तृणमूलच्या नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम बंगालच्या एका सभेत म्हटले होते की, दीदी तुमची पायाखालची जमीन सरकली आहे. 23 मे रोजी निकाल जाहीर होतील तेव्हा तुमचे आमदार तुम्हाला सोडून पळून जातील. आजही तुमचे 40 आमदार माझ्या संपर्कात आहेत.” दीदी तुम्ही बंगाली जनतेचा विश्वासाघात केला असून त्याचे उत्तर बंगालचे तरुण तुम्हाला देतील असेही मोदी म्हणाले.