
कोरोना व्हायरसमुळे क्रीडाविश्व ठप्प झाले असतानाच 24 जुलैपासून सुरू होणाऱया टोकियो ऑलिम्पिकवर मात्र फरक पडणार नसल्याचे स्पष्ट मत ऑलिम्पिक समितीचे जॉन कोटस् यांनी सोमवारी व्यक्त केले आहे. टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलण्यात येईल किंवा रद्द करण्यात येईल याबाबतचा अंतिम निर्णय मे महिन्यात घेण्यात येईल असे ऑलिम्पिक समितीतील सदस्यांकडून सांगण्यात आले होते; पण टोकियो ऑलिम्पिक नियोजित अर्थातच 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत होणार असल्याचे ठामपणे जॉन कोटस् यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले आहे.
टोकियो ऑलिम्पिक नियोजित वेळेत होईल की पुढे ढकलण्यात येईल की रद्द करण्यात येईल याबाबत मे महिन्यात फैसला करण्यात येईल असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे माजी उपाध्यक्ष डीक पाऊंड म्हणाले होते. यावर जॉन कोटस् म्हणाले, हे त्यांचे वैयक्तिक मत होते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. टोकियो ऑलिम्पिकला अद्याप अवधी आहे.
नियोजित वेळेतच होणार – शिंजो ऍबे
जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे यांनीही टोकियो ऑलिम्पिक नियोजित वेळेत होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, कोरोना व्हायरसवर जपान मात करील आणि प्रतिष्ठsची स्पर्धा व्यवस्थित पार पडेल.




























































