टोरंट पॉवरचा महावितरणचा लचका तोडण्याच्या हालचाली, पुणे आणि नागपूर शहरात परवाना मिळवण्यासाठी अभ्यास सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खासगी वीज कंपन्यांमध्ये महावितरणचे लचके तोडण्याची स्पर्धाच सुरू असल्याचे दिसत आहे. महावितरणच्या भांडूप परिमंडळात वीज वितरण परवाना मिळावा म्हणून अदानी इलेक्ट्रिसिटीने वीज नियामक आयोगाकडे अर्ज केलेला असतानाच आता टोरंट पॉवरनेही पुणे आणि नागपूर शहरात वीज वितरण परवाना मिळवण्यासाठी हलचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी संबंधित कंपनीच्या अधिकाऱयांकडून परिसरातील वीज वितरण व्यवसायाचा अभ्यास सुरू केला आहे.

महावितरणकडे राज्यभरात वीज वितरण करण्याचा परवाना असून त्यांच्याकडे जवळपास पावणेतीन कोटी वीज ग्राहक आहेत. यामध्ये शहरी भागातून महावितरणला चांगला महसूल मिळत असून त्यावरच त्यांचा कारभार चालला आहे. मात्र आता त्यावर खासगी पंपन्यांची वक्रदृष्टी पडली आहे. अदानीने भांडूप, नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरात वीज वितरण परवाना मिळावा म्हणून वीज आयोगाकडे अर्ज केलेला आहे. त्यानंतर आता टोरंट पॉवर पंपनीनेही नागपूर आणि पुणे शहरात समांतर वीज वितरण परवाना मिळावा म्हणून तेथील वीज यंत्रणेबरोबरच मिळणारा महसूल, वीज गळती, आवश्यक मनुष्यबळाचा अभ्यास सुरू केल्याचे महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले. दरम्यान, टोरंट पॉवरने वीज वितरण परवान्यासाठी वीज नियामक आयोगाकडे अर्ज केला आहे का, याबाबत विचारणा केली असता अद्याप टोरंटकडून असा कोणताही अर्ज आला नसल्याचे आयोगाचे सचिव अभिजित देशपांडे यांनी सांगितले.

दोन्ही शहरांत 1261 कोटींचा महसूल
महावितरणला भांडूप परिमंडळाखालोखाल पुणे शहर आणि नागपूर शहरातून चांगला महसूल मिळतो. पुणे शहरातून महिन्याला 941 कोटी रुपये तर नागपूरमधून 320 कोटी रुपये मिळतात. त्याचमुळे खासगी पंपन्यांचा यावर डोळा आहे.