टोयोटाने आणली मिनी एसयूव्ही

आघाडीची कार निर्माती कंपनी टोयाटाने अर्बन क्रुझर ही मिनी एसयुव्ही लाँच केली आहे. या कारची एक्स शोरुम किंमत 8.40 लाख रुपये आहे. कंपनीने लाँच केलेली ही पहिलीच कॉम्पॅक्ट एसयुव्ही कार असून त्यासाठी कंपनीने मारुती सुझुकीसोबत भागीदारी केली आहे.

सहा प्रकारांत ही कार मिळणार असून दसऱ्य़ानिमित्त म्हणजे ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत ही कार बाजारात येणार आहे. अर्बन क्रुझरमध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन असून पॉवर 105 पीएस तर टॉर्क 138 एनएम आहे. यात एसएचवीएस माइल्ड-हाइब्रिड टेक्नोलॉजी देखील असणार आहे. 16 इंच स्टील व्हील, एलईडी प्रोजेक्टर डबल-डिन ऑडियो सिस्टम, ऑडियो कंट्रोल माउंटेड स्टीयरिंग, की-लेस एंट्री 7.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम अशा सुविधा मिळणार आहेत. ह्युंदाई वेन्यू, महिंद्रा एक्सयूवी 300, टाटा नेक्सॉन या कारसोबत अर्बन क्रुझरची स्पर्धा असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या