“राजा का बेटा नही, जो काबील होगा वोही राजा बनेगा!” पाहा हृतिकच्या ‘सुपर 30’ चा दमदार ट्रेलर

74

सामना ऑनलाईन । मुंबई

हृतिक रोशन अभिनित सुपर 30 या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच तो चर्चेत होता. एका खऱ्या आयुष्यातील घटनेवर आधारित या चित्रपटात हृतिक दमदार पुनर्पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

उत्तर हिंदुस्थानी लहेजात बोलत आनंद कुमार ही व्यक्तिरेखा साकारणारा हृतिक या ट्रेलरमध्ये गोरगरीब मुलांना शिक्षण देताना दिसणार आहे. साधन सामुग्रीची कमतरता आणि असंख्य प्रश्न असणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना घडवणारा शिक्षक या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल असून हा चित्रपट 12 जुलै 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.

पाहा ट्रेलर-

आपली प्रतिक्रिया द्या