मटण-चिकन काहीही मिळणार नाही; पण मत मलाच द्या! तृतीयपंथी उमेदवाराचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महेश पवार, सातारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात प्रशांत वारकर नावाचा तृतीयपंथी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. सामना ऑनलाईनने या उमेदवाराला गाठून त्याची मुलाखत घेतली. वारकर याने यावेळी बोलताना सांगितलं की मला पाठिंबा देणाऱ्यांना मी चिकन देऊ शकणार नाही किंवा मटणही देऊ शकणार नाही. उलट मला मत देणाऱ्यांनी मतासोबतच एक रूपया माझ्या पदरात घालावा. या पैशातून मला संपूर्ण मतदारसंघ फिरता येईल असं वारकर याने सांगितलं आहे. वारकरने निवडणुकीमध्ये का उतरला या प्रश्नाचेही उत्तर दिले. पाहा तो काय म्हणतोय.