पुण्यात तृतीयपंथीयाने पैसे मागण्याच्या बहाण्याने लांबवले पाकीट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिग्नलवर थांबलेल्या तृतीयपंथीयाला 20 रूपये देण्यासाठी पैशांचे पाकीट काढत असताना एका तृतीयपंथीयाने तरूणाच्या पाकीटातून 17 हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घोरपडीत घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. सुरज राघवाचारी (वय 22, रा. वानवडी ) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सुरज दुचाकीवरून घोरपडी परिसरातून जात होते. त्यावेळी आमी पब्लिक स्कूलच्या गेटपुढे लाल सिग्नल सुरू झाले. त्यामुळे सुरज थांबला असता एका तृतीयपंथीयाने त्याच्याकडे 20 रूपये मागितले. त्यावेळी त्यांनी पैशांचे पाकीट काढले असता, तृतीयपंथीयाने अचानक सुरजच्या हातातील 17 हजार रूपये काढून घेत पळ काढला. त्याशिवाय दुसऱ्याने त्याला मदत करत रिक्षात बसून ते पसार झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक केली आहे.