आनंद दिघे यांना आदरांजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, ठाणे

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी शिवसेनेचे पदाधिकारी तसेच शिवसैनिकांनी शक्तीस्थळ व आनंदाश्रम येथे जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे, उपनेते अनंत तरे, ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, महापौर मीनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, शहरप्रमुख रमेश वैती, उपशहरप्रमुख जगदीश थोरात, सचिव विलास जोशी, नगरसेवक अशोक वैती, नगरसेविका पल्लवी कदम, विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, विभागप्रमुख कमलेश चव्हाण, उपविभागप्रमुख बाळा गवस, शाखाप्रमुख विश्वास निकम आदी उपस्थित होते.