तृणमूलच्या 20 खासदारांचा ‘एनडीए’ला पाठिंबा; लोकसभा अध्यक्षांना पत्र; काकोली घोष दस्तिदार यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तृणमूलच्या 28 लोकसभा खासदारांपैकी तब्बल 20 खासदारांच्या एका गटाने भाजप प्रणित ‘एनडीए’ (NDA) मध्ये सामील होण्याची घोषणा केली आहे. पक्षाने प्रतोद (Whip) पदावरून हटवल्यामुळे नाराज झालेल्या ज्येष्ठ नेत्या काकोली घोष दस्तिदार यांनी ही माहिती दिली आहे. याबाबत ते लवकरच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र देणार आहेत.

“माझ्या सोबतीने तृणमूलच्या जवळपास २० खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही ‘एनडीए’चा भाग होऊ इच्छितो, हे आम्ही या पत्राद्वारे त्यांना अधिकृतपणे कळवणार आहोत.”

याच गटातील दुसऱ्या एक बंडखोर खासदार शर्मिला सरकार यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, “आम्ही 20 खासदारांचा एक वेगळा गट तयार करत असून एनडीएला पाठिंबा देत आहोत. या गटाच्या मुख्य प्रतोद (Chief Whip) म्हणून काकोली घोष दस्तिदार तर उपनेत्या म्हणून शताब्दी रॉय असतील.”