
टीआरपी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रँचने अटक केलेला पार्थ दासगुप्ता, विकास खानचंदानी आणि रोमील रामगडियाविरोधात आज 3 हजार 600 पानांचे पुरवणी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. या आरोपपत्रात 59 जणांच्या साक्षी असून 12 फॉरेन्सिक ऑडिटर, पोलीस आणि संगणक तज्ञांचे पुराव्याचे अहवाल जोडले आहेत. या आधी आरोपीविरोधात 1400 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
ऑक्टोबरमध्ये मुंबई क्राइम ब्रँचने टीआरपी प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. घोटाळेबाजांच्या मुसक्या आवळण्यासाठी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत सांडभोर यांच्या नेतृत्वाखाली सीआययूचे प्रभारी निरीक्षक सचिन वाझे, रियाझुद्दीन काझी, बिपीन चव्हाण, कीर्ती माने यांच्या पथकाने बॅरोमीटरच्या देखभालीचे पंत्राट असलेल्या हंसा पंपनीच्या आजी-माजी कर्मचारी आणि जाहिरात व विविध वाहिन्यांच्या मालकांना अशा 12 जणांना अटक केली होती. त्यांच्याविरोधात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 1400 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.
पहिल्या आरोपपत्रानंतर क्राइम ब्रँचने कारवाईचा धडाका सुरू ठेवत रिपब्लिकन टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी, बार्पचे माजी सीओओ रोमील रामगडिया आणि माजी सीईओ पार्थ दासगुप्ताला बेडय़ा ठोकल्या. पार्थ या घोटाळय़ाचा मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले. दरम्यान, पार्थचे रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्याशी लागेबांधे असल्याचे उघड झाल्यावर त्याचा उल्लेख रिमांड कॉपीत केला होता.

























































