
टीआरपी प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचने आणखी एकाला अटक केली. हरिष कमलाकर पाटील असे त्याचे नाव आहे. त्याच्या एका कंपनीने टीव्ही पाहणाऱयांना अटक आरोपीच्या माध्यमातून पैसे दिले गेल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात अभिषेक उर्फ अमित हा फरार असून पोलीस त्याच्या शोध घेत आहेत.
मुंबई क्राईम ब्रँचने टीआरपी घोटाळ्यात नुकतीच रामजी शर्मा आणि दिनेश विश्वकर्माला अटक केली होती. त्या दोघांच्या चौकशीत पोलिसांना हरिषची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी हरिषला पवई येथून अटक केली. हरीषच्या एकूण सात कंपनी आहेत. त्या पैकी एका कंपनीच्या पत्यावर जाऊन पोलिसांनी पाहणी केली. तेव्हा तेथे त्या नावाची कंपनीच नसल्याचे उघड झाले. त्याच्या एका कंपनीला एका चॅनल्सकडून पैसे आले होते. आलेले पैसे अटक आरोपीच्या माध्यमातून टीव्ही पाहणाऱयांना वाटले गेल्याचे तपासात समोर आले आहे.
हरिषच्या चौकशीत अभिषेकचे नाव समोर आले.अभिषेक हा स्वतŠची खोटी ओळख सांगून देशभरातील महामार्गानजीकच्या हॉटेलमध्ये राहतो. त्याने चार वर्षांपूर्वी मृत पावलेल्या एकाच्या नावावर मोबाईल नंबर घेतला होता. तर रामजी, उमेश आणि अभिषेक हे देशभरातील काही ठिकाणी एकत्र गेले होते अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
– टीआरपी घोटाळ्यात अटकेत असलेल्या उमेश मिश्रा, शिरीष पतनशेट्टी, आणि नारायण शर्माच्या जामीन अर्जावर सोमवारी निर्णय.






























































