
नगर-पुणे महामार्गावर गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास रेल्वे पुलावर एसटी बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन 2 ठार तर १५ जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा तसेच खाजगी हॉस्पिटल उपचार सुरु आहेत. या अपघातामध्ये जखमी झालेल्या तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यातील एका युवकाला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे .विशेष म्हणजे या अपघातांमध्ये ट्रकचालक हा पळून गेला आहे . या घटनेसंदर्भात येथील कोतवाली पोलिस ठाण्यांमध्ये अपघाताचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान या महामार्गावर असलेला रेल्वेचा पूल हा जुना असल्यामुळे त्याच्या ऑडिट विषय आता पुढे येणार आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्यांना स्थानिक नागरिकांनी तसेच नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना मदतही केली.
या अपघातात मृत पावलेल्या दोन जणांचे रात्री उशिरापर्यंत ओळख पटलेली नव्हती. या अपघातात जखमींची नावे पुढीलप्रमाणे असून राजेंद्र मारुती पवार (वय ५२, रा.जामखेड ),जॉर्ज मार्कस गायकवाड (वय २६, रा. बुरुडगाव, नगर ) प्रसाद धनंजय चव्हाण ( वय २३, रा. चांदे कसारे, कोपरगाव ) एकनाथ सुग्रीव रोडे ( वय २४, रा. वैजा, पाटोदा-आष्टी) शुभम किशोर दगडे (वय २३, रा. शिरूर कासार, जि. बीड) अकबर जैनुद्दीन शेख ( वय ७४, रा. शिरूर, जि. पुणे) शालन महादेव साठे (वय ४५, रा. औंध, पुणे -७ ) महादेव दादू साठे (वय ५८, रा. औंध , पुणे -७), गणेश सुभाष लष्कर (वय ३०, रा. केडगाव ), भरत काकासाहेब काकडे (वय ३०, रा.कीन्ही तालुका आष्टी जिल्हा बीड), मंगेश गंगाधर राणे (वय 40 , रा. विद्यानगर , पुणे ) जखमींची नावे आहेत. तर, जिल्हा रुग्णालयात तील ११ जखमीपैकी जखमींची अद्याप ओळख पटलेली नाही.
गुरुवारी रात्री ८:३० वाजता नगर बस स्थानकातुन जामखेड मुंबई ही बस क्र.MH 11 BL 9238 नगरहुन पुण्याच्या दिशेने जात असताना समोरुन येणारी एक ट्रक क्र. MH 16 BC 1089 यांची रेल्वे पुलावर समोरासमोर जोराची धडक होऊन हा अपघात झाला. अपघात झाला तेव्हा जवळूनच मोटार सायकलवरुन जाणारा केडगावचा रहीवासी याला जोरदार धडक होऊन तो पुलावरुन खाली फेकला गेला. त्यात त्याचे दोन्ही पाय निकामी झाले असुन एसटीचा ड्रायव्हर आणी कंडक्टरही जखमी झाले असुन या अपघातात 2 ठार तर १५ प्रवासी जखमी झाले आहेत. बसमधे २५ ते ३० प्रवासी असल्याची माहीती एसटीचे ट्रॅफीक इन्चार्ज यांनी सांगितले.
गुरुवारी झालेल्या अपघातात बाजूच्या असलेल्या कठड्याला एसटी जोरदार धडक बसली. एसटीतील काही प्रवास करणे उड्या टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र पुलाखाली अंतर भरपूर असल्यामुळे आणि पण पूल उंच असल्यामुळे ते जखमी झाले. तर काहींना बस मध्ये मोठ्या प्रमाणावर मार लागला. अपघाताची माहिती कालूबाजूला जाणाऱ्या नागरिकांनी तात्काळ पोलिसांना दिल्यानंतर कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास वाघ यांच्यासह पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. तसेच जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक व परिसरातील तरुण मुले हे सुद्धा अपघात स्थळी रवाना झाले. या अपघातामुळे नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शिवसेनेचे नगरसेवक दीपक खैरे , मनोज कोतकर यांच्यासह अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, व त्यांनी जखमींना पुढील उपचारासाठी मदत सुरू केली होती. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कालूबाजूच्या नागरिकांची गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली होती. पोलिसांनाही गर्दी हटवणे मोठे अवघड होऊन बसले होते. पुलाच्या मध्यभागी हा अपघात झाल्यामुळे पुण्याहून येणारी वाहतूक बायपास मार्गे तर पुण्याकडे जाणारी वाहतूक केडगाव बायपास मार्गे वळविण्यात आली होती. या अपघातात एसटीच्या उजव्या बाजूचा चक्काचूर झाला तर ट्रक च्या पुढच्या बाजूचा चेंदामेंदा झाला. या अपघाताच्या वेळी मोटरसायकलवरून केडगावच्या दिशेने घरी जाणारा लष्कर हा बसा मागून जोरदारपणे मार लागल्याने त्याचे दोन्ही पाय निकामी झाले आहे . त्याच्या डोक्याला सुद्धा जबरदस्त मार लागला असून त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती गंभीर असून त्याला पुढील उपचारार्थ पुणे येथे हलवण्यात आले आहे.
जखमी झालेला 11 जणांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे . तर विघ्नहर्ता रुग्णालय मध्ये दोन जणांना दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. तर अन्य दोन जणांना नोबेल हॉस्पिटल येथे हलवण्यात आले आहे. पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन अपघात झालेले दोन्ही वाहने हे क्रेनच्या साह्याने बाजूला करून नगर-पुणे महामार्ग हा वाहतुकीसाठी रात्री एक वाजता खुला केला आहे.


































































