
अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने पुन्हा एकदा हिंदुस्तानी आणि परदेशी विद्यार्थ्यांचा टेन्शन वाढवणारा आदेश जारी केला आहे. यापुढे विद्यार्थ्यांनी क्लास बंक केल्यास किंवा शिक्षण संस्थेला माहिती न देता मध्येच अभ्यासक्रम सोडल्यास अशा विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द केला जाईल, असा आदेश अमेरिकन दूतावासाने जारी केला आहे. ट्रम्प प्रशासनाच्या या आदेशामुळे हिंदुस्थानी विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
अमेरिकन दूतावासाने मंगळवारी एका निवेदनात म्हटले आहे, जर तुम्ही अभ्यासक्रम सोडला, क्लास बंक केली किंवा शिक्षण संस्थेला माहिती न देता मध्येच अभ्यासक्रम सोडला तर, विद्यार्थी व्हिसा रद्द होऊ शकतो आणि भविष्यात अमेरिकन व्हिसासाठी पात्रता गमावू शकता. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या व्हिसाच्या अटींचे काटेकोरपणे पालन करणे आणि विद्यार्थी दर्जा कायम ठेवणे आवश्यक आहे.