टय़ुनिशियाच्या ओन्सची झेप, विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 ट्युनिशियाची 26 वर्षीय महिला टेनिसपटू ओन्स जॅब्युएर हिने सोमवारी पोलंडच्या इगा स्विअतेकला 5-7,   6-1, 6-1 अशा फरकाने पराभूत करीत विम्बल्डन टेनिस ग्रॅण्डस्लॅममधील महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. विम्बल्डन टेनिस ग्रॅण्डस्लॅमची उपांत्यपूर्व फेरी गाठणारी ती टय़ुनिशियाची पहिलीच टेनिसपटू ठरली हे विशेष.