मुंबईने  संधी गमावली, रेल्वेच्या पहिल्या डावात 307 धावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली  

मुंबईने रणजी क्रिकेट स्पर्धेत ‘अ’ गटात रेल्वेला झटपट गुंडाळून मोठी आघाडी घेण्याची संधी शनिवारी गमावली. पण तुषार देशपांडेने 70 धावा देत 6 फलंदाजांना बाद केल्यामुळे मुंबईला रेल्वेचा पहिला डाव 307 धावांमध्ये रोखण्यात यश आले. पहिल्या डावात 411 धावा करणार्‍या मुंबईने तिसर्‍या दिवसअखेरीस दुसर्‍या डावात 2 बाद 57 धावा केल्या असून आता हा संघ 161 धावांनी पुढे आहे. रेल्वेने 6 बाद 115 या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. अरिंदम घोषने 71, हर्ष त्यागीने 39, अविनाथ यादवने 48, एम. खत्रीने 29 आणि अनुरीत सिंगने नाबाद 38 धावांची खेळी साकारली. मुंबईला तळाचे फलंदाज झटपट बाद करण्यात अपयश आले.