आधी कर्मचाऱ्यांना घरचा आहेर दिला, आता युजर्स रडारवर

मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरचे सिईओ एलन मस्कने ट्विटरचा कारोभार हाती घेतल्यानंतर अनेक बदल केले आहेत. मस्क यांनी अनेक कर्मचाऱ्यांना घरचा आहेर दिला आहे. यातच आता आणखी एका नव्या फिचरबाबत माहिती समोर आली आहे. याबाबत सांगण्यात आले आहे की, या धोरणाचे उल्लंघन केल्यास युजर्सना व्हर्च्युअल जेलमध्ये लॉक केले जाईल.

व्हर्च्युअल जेलमध्ये लॉक करणार म्हणजे युजर्स ट्विटरवर कोणत्याही प्रकारचे काम करु शकत नाही. याबाबत एका ट्विटर युजरने मस्क यांना एक सूचना दिली होती. त्यांच्या एका ट्विटर फॉलोअरने त्यांना सांगितले की, मायक्रो ब्लॉगिंग साइटला सुधारण्यासाठी युजर्संना ‘ट्विट जेल’मध्ये टाकले जाऊ शकते.

युजरने पोस्ट केले की, ट्विटर जेलमध्ये जाणाऱ्या युजरला त्यांना जेलमध्ये का टाकले त्याची सगळी कारणं द्यावी लागतील आणि त्यांचे अकाऊंट कधीपर्यंत फ्री होईल हेही सांगावे लागेल. याचे उत्तर देताना ट्विटरवर मस्कने सांगितले ते या गोष्टीशी सहमत आहेत. ट्विटर युजरने मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्ममध्ये आणखी चांगले बदल घडविण्यासाठी अन्य सल्लेही देण्यात आले. एका युजरने पोस्ट केले आहे की, ट्विट अॅक्टिव्हिटीबरोबरच रीच स्टॅटिक्सही अॅ़ड करायला हवे. खरंतर, हे फार उपयोगी नाही. मात्र दिसायला फार कूल वाटतं. त्याला मस्कने चांगली कल्पना म्हणून सांगितले.

एलन मस्क यांनी ट्विटरवर अनेक बदल केले आहेत. येत्या काळात ट्विटरवर मोठा बदल पाहायला मिळेल. यामध्ये एक मोठा बदल असाही आहे की, कंपनी ट्विटर डीएला एण्ड टू एण्ड एन्क्रिप्टेड बनवू इच्छित आहे. त्यामुळे युजर्सच्या ट्विटरवरुन मेसेज लीक होणार नाही. याशिवाय, कंपनी लाँग-फॉर्म मजकूर थ्रेडमध्ये रूपांतरित करण्याचे काम करत आहे. सध्या वापरकर्त्यांना ट्विटसाठी 280 शब्दांची मर्यादा आहे. कंपनी पेड सब्स्क्रिप्शनवर काम करत आहे. यासह युजर्स पैसे देऊन आपला व्हेरीफाईड करु शकता. कंपनीने ते प्रसिद्धही केले होते. मात्र त्याच्या गैरवापरामुळे ते तूर्तास बंद करण्यात आले आहे.