ऍपल युझर्ससाठी ट्विटर वापरणं पडणार महाग

ऍपल फोन वापरण्यासाठी तसा मोठा खर्च करावा लागतो. मात्र ऍपल फोनवरील इतर सेवाही वापरणं खर्चिक असतं. ऍपल युझर्सना आता ट्विटर वापरणं देखील महाग होणार आहे. त्यासंदर्भातील घोषणा ट्विटरने केली आहे. ट्विटर इंक सोमवारी ऍपल युझर्ससाठी आपल्या सदस्यता सेवेची ट्विटर ब्लूची सुधारित आवृत्ती पुन्हा लाँच करेल, असे कंपनीने शनिवारी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

कंपनीने म्हटले आहे की युझर्स नव्या सेवेची सदस्यता घेऊ शकतात ज्यामुळे ग्राहकांना ट्विट एडिट करणे, चांगल्या प्रतीचे व्हिडीओ अपलोड करणे आणि ब्लू चेकमार्क असणारे अधिकृत हँडल वापरणे शक्य होईल. यासाठी स्मार्टफोन $8 प्रति महिना खर्च येणार आहे. परंतु Apple iOS वापरणाऱ्यांना $11 प्रति महिना खर्च येईल.

Apple युझर्सना इतरांपेक्षा जास्त शुल्क का आकारले जात आहे हे ट्विटरने स्पष्ट केले नाही. परंतु असे मीडिया रिपोर्ट आले आहेत की कंपनी अॅप स्टोअरमध्ये आकारले जाणारे शुल्क ऑफसेट करण्याचे मार्ग शोधत आहे.

बनावट खाती वाढल्याने ट्विटरने सुरुवातीला ट्विटर ब्लू नोव्हेंबरच्या सुरुवातीला लाँच केले होते. त्यानंतर 29 नोव्हेंबर रोजी ते पुन्हा सुधारणांसहीत आणणार होते, मात्र वेळापत्रकात बदल करण्यात आला.

एलॉन मस्क यांनी नोव्हेंबरमध्ये ट्विटरची मालकी घेतली होती. त्यानंतर त्यांनी अॅपलवर ट्विटरला त्याच्या अॅप स्टोअरवरून ब्लॉक करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता आणि आयफोन निर्मात्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहिरात करणे थांबवले होते.

मात्र, त्यानंतर अॅपलचे मुख्य कार्यकारी टीम कुक यांच्याशी झालेल्या भेटीनंतर अॅपलच्या अॅप स्टोअरसंदर्भात ट्विटरबद्दलचे गैरसमज दूर झाल्याचं त्यांनी ट्विट केलं.

दरम्यान, ट्विटर आणि ऍपल या दोघांनीही प्रतिक्रियांसाठी रॉयटर्सच्या विनंतीला प्रतिसाद दिला नाही.