
सामना ऑनलाईन । मुंबई
राज्यात 1 जुलैपासून 33 कोटी वृक्षलागवडीचे उद्दीष्ट ठेवत वृक्षलागवडीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत राज्यात पाच दिवसात 2 कोटी 17 लाख 85 हजार 968 रोपे लावण्यात आली आहेत. या वृक्षलागवड कार्यक्रमात आतापर्यंत जवळपास 4 लाख लोक सहभागी झाले आहेत.
अमरावती विभागात आतापर्यंत 18 लाख 86 हजार 310, औरंगाबाद विभागात 31 लाख 73 हजार 794, कोकण विभागात 43 लाख 74 हजार 880, नागपूर विभागात 28 लाख 88 हजार 194, नाशिक विभागात 34 लाख 75 हजार 747 आणि पुणे विभागात 59 लाख 87 हजार 043 रोपे लावण्यात आली आहेत. यात वन विभागाने 1 कोटी 20 लाख 82 हजार 031, सामाजिक वनीकरण विभागाने 56 लाख 50 हजार 901, वन विकास महामंडळाने 6 लाख 92 हजार 471 रोपे लावली आहेत. ग्रामपंचायत क्षेत्रात आतापर्यंत 17 लाख 28 हजार 986 रोपे लागली आहेत. इतर विभागांनी मिळून 16 लाख 31 हजार 579 वृक्षांची लागवड केली आहे. राज्यात 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत लोकसहभागातून 33 कोटी वृक्षलागवड केली जाणार आहे. आतापर्यंत पाच दिवसात राज्यात 6.31 टक्के वृक्षलागवड झाली आहे.



























































