दुचाकींच्या धडकेत तरूणासह जेष्ठ ठार

पुणे शहरालगत जुना कात्रज घाट आणि शेवाळेवाडी परिसरात दुचाकींच्या दोन वेगवेगळ्या अपघातात तरूणासह जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ आणि हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरधाव दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार खाली पडून गंभीररित्या जखमी झाल्यामुळे ठार झाला. हा अपघात 4 एप्रिलला रात्री सात वाजण्याच्या सुमारास जुना कात्रज घाटातील प्रथमेश हॉटेलसमोर घडला. सुनील कांबळे (वय 32, रा. टिंबर मार्केट ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विकी कांबळे (वय 23, रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे.
दुसNया अपघातात भरधाव दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत पादचारी जेष्ठाचा मृत्यू झाला. हा अपघात काल सकाळी नउ वाजण्याच्या सुमारास शेवाळेवाडीत घडला. पांडुरंग संभाजी गायकवाड (वय 65) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय गायकवाड (वय 26) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या