बंगळुरू स्फोटप्रकरणी दोघे ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बल्लारी जिह्यातील कौल बाजार येथील कापड व्यापारी आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या एका हस्तकाला राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि केंद्रीय गुन्हे शाखेने बंगळुरू येथील रामेश्वरम पॅफेमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी ताब्यात घेतले आहे. बंदी घातलेल्या पीएफआयचा सक्रिय सदस्य असलेल्या या दोघांपैकी एकजण या कटाचा भाग असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.