वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची धमकी देत खंडणी मागणारे दोन तोतया पत्रकार अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा धाक दाखवत त्याच्याकडून खंडणी वसूल करणाऱ्या दोन तोतया पत्रकारांना पोलिसांनी अटक केली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल कांबळे व जहीर मेमन अशी ताब्यात घेतलेल्या तोतया पत्रकारांची नावे आहेत. सुधीर रामचंद्र आलाट (51, रा. नरवीर तानाजी वाडी, शिवाजी नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

आलाट हे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सक्रीय सहभागी आहेत. काही दिवसांपुर्वी कांबळेने आलाट यांना फोन करून भेटायला बोलाविले होते. त्यावेळी आलाट यांनी त्याला मला डोळयांचे ऑपरेशन करायचे असल्यामुळे लवकरच भेटू असे सांगितले. मात्र कांबळे यांनी आलाट यांना तुम्ही मला लवकरच भेटा तुमच्या विरध्द मोठे कांड चालु आहे, त्याप्रमाणे आलाट हे कांबळे व मेमन यांना हॉटेलात भेटले . तेव्हा दोघांनी त्यांना मोठया पदावरील व्यक्ती तुमच्या मागे लागले असुन त्यांनी आमच्याकडे तुमच्या विरुद्ध तक्रारी केलेल्या आहेत. तुमच्या विरुद्ध पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने गुन्हा दाखल केला आहे.

तुम्हाला अटक करण्याचे आदेश दिले आहेत. जर तुम्हाला प्रकरणातुन वाचायचे असेल तर आम्हाला 2 लाख रुपये द्यावे लागतील. तुम्ही 2 लाख रुपये दिल्यास सेफ राहाल नाहीतर पोलीस अधिकारी तुम्हाला आतच टाकतील अशी धमकी दिली. राहुल कांबळे यांनी पोलीस अधिकारी, वकील व इतर दोन ते तीन जणांना फोन करून सुधीर आलाट यांच्या विरुद्ध आम्ही केलेल्या तक्रारी मागे घेत आहोत असे सांगितले. यानंतर आलाट यांनी दोघांना ७५ हजाराची रक्कम दिली. मात्र राहिलेले1 लाख 25 हजार रुपयांसाठी दोघेही आलाट यांना वारंवार फोन करुन धमकी देत होते. वैतागून आलाट यांनी खंडणी विरोधी विभाग दोनकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या पथकाने तोतया पत्रकारांना अटक केली.