विहीरीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू; अंबाजोगाईतील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

स्वाराती रुग्णालयाच्या रोडवरील कंपनीच्या बागेत असलेल्या विहीरीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने अंबाजोगाईमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

अंबाजोगाई शहरातील स्वाराती रुग्णालयाच्या रोडवरील कंपनीच्या बागेतील एका विहीरीमध्ये बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये निदा अल्ताफ शेख (वय 16) आणि सानिया अल्ताफ शेख ( वय 18) या दोघीजणी विहीरीच्या पाण्यामध्ये बुडून मृत्यूमुखी पडल्या आहेत. हॉलोवर्स कॉर्टर भागात वास्तव्यास असणाऱ्या या दोघीजणी शुक्रवारी सकाळी मैत्रीणीच्या वाढदिवसासाठी मोरेवाडीला आल्या होत्या. दुपारी त्या तिथून परतत असताना ही दुर्घटना घडली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहीरीच्या बाहेर काढून शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवले आहेत. या दोघींच्या मृत्यूचे गूढ उकलण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे.