
सामना ऑनलाईन । कोहिमा
नागा दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या घातपातामध्ये आसाम रायफलचे दोन जवान शहीद झाले तर चार जण जखमी झाले. मोन जिल्हय़ात आज ही घटना घडली. दुपारी तीनच्या दरम्यान आसाम रायफलच्या सहा जवानांच्या टीमवर अबोई येथे नागा दहशतवाद्यांनी ग्रेनेडसह हल्ला केला. यात हवालदार फतेहसिंह नेगी आणि शिपाई हुंगांगा कोनयाक हे शहीद झाले. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



























































