मुंबईत गोवरचे दोन रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गोवर रुग्णांची संख्या नियंत्रणात असून आज दिवसभरात गोवरचे दोन रुग्ण तर 14 संशयित रुग्ण सापडले. आज सापडलेले दोन रुग्ण हे 2022 साली घेण्यात आलेल्या गोवरच्या संशयित रुग्णांच्या नमुन्यांपैकी असल्याचे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. बांधकामाच्या ठिकाणी आणि पुलाखालील मुलांच्या गोवर लसीकरणाची माहिती सुरू असून आतापर्यंत बांधकामाच्या ठिकाणी 85 मुलांना पहिला डोस तर 48 मुलांना गोवरचा दुसरा डोस देण्यात आला आहे. पुलाखाली राहणाऱया 96 मुलांना पहिला डोस तर 44 मुलांना दुसरा डोस देण्यात आला आहे.