
उत्तर प्रदेशमध्ये पबजी खेळण्याच्या नादात दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही मुलांचे वय 14 असून ते दहावीत शिकत होते.
मिळालेल्या माहितीनुसार मथुरा येथील लक्ष्मी नगरमध्ये गौरव कुमार आणि कपिल कुमार हे रेल्वे रुळावर बसून पबजी खेळत होते. त्यांनी कानात हेडफोन घातले होते त्यामुळे त्यांना बाहेरचा आवाज येत नव्हता. तेव्हा भरधाव वेगाने मालगाडी आली आणि दोघांचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहाशेजारी मोबाईल फोन्स आढळले आहेत. तेव्हा फोनमध्ये पबजी गेम सुरू होता. या ऑनलाईन गेमबद्दल आपल्याला काहीच माहित नसल्याचे कपिल कुमारचे वडील संजय कुमार यांनी सांगितले आहे.



























































