तळणी येथे दोन विद्यार्थ्यांचा शेत तळ्यात पाय घसरून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । किल्लारी

किल्लारी पासून जवळच असलेल्या तळणी येथील दोन विद्यार्थ्यांचा शेत तळ्यात पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना दि. 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत किल्लारी पोलिसांनी सांगितले की, तळणी पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शेत तळ्यात संतोष विठ्ठल प्रताळे (15) वर्ष व किरण हरी गाडे (14) वर्ष राहणार दोघेही तळणी ता. औसा हे शेतात गेले होते. यावेळी पाण्यात उतरत असतांना ही मुले पाय घसरून पडली असावीत असा अंदाज आहे.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही विद्यार्थ्यांचा मृतदेह पोलिसांनी पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी किल्लारी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. याबाबत किल्लारी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.