कश्मीरमध्ये दोघा दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांबरोबर आज झालेल्या चकमकीत लश्कर-ए-तोयबाच्या दोघा दहशतवाद्यांचा खात्मा झाला. यातील एक दहशतवादी हा पाकिस्तानी आहे. कुपवाडातील चतकाराव कांदी या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाने शोधमोहीम राबवली. यावेळी झालेल्या चकमकीत तोयबाचे हे दहशतवादी ठार झाले, अशी माहिती जम्मू-कश्मीरचे पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी दिली.