
लॉकडाऊनबाबत सर्वपक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीमध्ये अॅक्शन प्लॅन तयार करण्याचा निर्णय झाला. यामध्ये टास्क फोर्ससोबत चर्चा करून त्यांनी केलेल्या सूचनेवर कार्यवाही सुरू असून कोणतेही राजकारण न करता कोविडला नष्ट करायचा असेल तर सर्वांनी मिळून हा लढा देण्याचा सर्वपक्षिय संकल्प केला. असे उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी आज झुम अॅपद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
सामंत पुढे ते म्हणाले, लॉकडाऊनचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकार्यांची बैठक घेतली, व्यापार्यांची बैठक झाली, सर्वपक्षिय बैठ घेतली. टास्क फोर्स कशी कारवाई त्याची बैठक झाली. बैठकीला सेनेकडुन खासदार विनायक राऊत, जिल्हा प्रमुख विलास चाळके, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विजय भोसले, रमेश कीर, राष्ट्रवादी बशिर मुर्तुझा, भाजपर्फत विनय नातू, जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, बाळ माने, मनसेचे वैभव खेडेकर उपस्थित होते. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, निवासी जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आदी उपस्थित होते. यामध्ये अॅक्शन प्लॅन करण्यात आला.
यामध्ये कोणतेही राजकारण न आता कोविडला घालावायचं असेल तर मिळून लढा दिली पाहिजे असा संकल्प केला. लॉकडाऊनसारखा कठोर निर्बंध आता लावण्याची वेळ आली आहे. त्यासाठी नवीन कोविड सेंटर, आरोग्य व्यवस्थेची तयारी, कशी असावी. हे निश्चित झाले. तशी तयारी प्रशासनाने केली आहे. अडिच हजाराच्या वर बेट आहेत. त्यामध्ये ऑक्सिन बेडपासून इतर बेडची व्यवस्था आहे. टास्कफोर चर्चा झाली. त्यांनीही काही काही सूचना केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
व्यापार्यांच्या बैठकीत देखील महत्त्वाचे निर्णय झाले. व्यापार्यांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्याचे ठरले. त्यासाठी कॅम्प घेतले जाणार आहे. सध्या व्यापारी वर्ग अडचणीत आहेत त्यांच्यावर कोणताही कायदेशीर बडगा उगारू नये, अशा सुचना प्रशासनाला केल्या आहेत.
व्यापर्यांनीही शासनाने कडक निर्बंध घातले तर सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे
जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा नाही. लवकरच नवीन ऑक्सिजन प्लॅट सुरू होणार आहे. रेमडीसिव्हर या इंजेक्शनाची निर्यात थांबावी ही मागणी महाविकास आघाडीने केली होती. केंद्राचे कौतुक करतो की त्यांनी लगेच निर्यातीवर बंदी आणली. मात्र ही इंजक्शन भाजपच्या कार्यालयात येण्याऐवजी जिल्हा रुग्णालयात यावी आणि त्याचे अधिकार जिल्हाधिकार्यांना द्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला.



























































