
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आझाद मैदानात आंदोलनाला बसलेल्या शिक्षकांची भेट घेतली. शिवसेना शिक्षकांच्या खांद्याला खांदा लावून उभी राहील, असे अभिवचन त्यांनी दिले. आपण सगळय़ांनी मिळून सरकारला असा करंट देऊ की, ते सत्तेच्या खुर्चीतून उडून पडले पाहिजेत. आता विजय मिळेपर्यंत थांबायचे नाही आणि विजयसुद्धा याच ठिकाणी साजरा करूया, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आंदोलनकर्त्या शिक्षकांची भेट घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त दिला.
राज्यातील सुमारे पाच हजार खासगी विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा निर्णय ऑक्टोबर 2024 मधील अधिवेशनात घेण्यात आला होता. मात्र दहा महिने उलटूनही अद्याप निधीची कोणतीही तरतूद सरकारने केली नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र संताप आहे. आपल्या मागण्यांसाठी 5 जूनपासून शिक्षक समन्वय समितीने आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, आमदार मिलिंद नार्वेकर, सचिन अहिर आदी उपस्थित होते.
राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा निर्णय हिवाळी अधिवेशनात सरकारकडून घेण्यात आला होता पण अद्यापही ह्या निर्णयावर सरकारकडून कोणतीही अंमलबजावणी नाही किंवा ठोस पाऊले उचलली गेली नाही. ह्याच पार्श्वभूमीवर आझाद मैदान येथे राज्यव्यापी शिक्षक आंदोलन सुरु आहे.… pic.twitter.com/uP55Z291kw
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 9, 2025