
भाजपचा शिवसेना संपविण्याचा डाव आहे. घटनेची पायमल्ली करून कारभार चालवला जात आहे. अशा परिस्थितीत आपल्याला लढायचे असून तुमची ठाम साथ मला हवी आहे. तुम्हीच शिवसेनेची ताकद आहात तेव्हा पुन्हा नव्या जोमाने आपण उभे राहू, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुण्यातील शिवसैनिकांना उभारी दिली.
मातोश्री येथे पुणे शिवसेनेच्या पदाधिकाऱयांची व सर्व नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, एकीकडे न्यायालयात बंडखोर आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न प्रलंबित असताना दुसकीकडे बहुमत चाचणी, विश्वासदर्शक ठराव मांडला जातो. घटनेची पायमल्ली सुरू असल्याचे मत त्यांनी नोंदवले. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या विरोधात आता शिवसेना न्यायालयाचे दरवाजेही ठोठावत असून अरुणाचल प्रदेशसारखा निकाल लागण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. यावेळी हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घ्या, असे आव्हानही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.
आम्ही साथ सोडणार नाही
यावेळी शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱहे यांनीही पुण्यातील शिवसैनिकांच्या वतीने म्हणणे मांडले. त्या म्हणाल्या की आपण एकजुटीने व ताकतीने काम करायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पुण्यातील शिवसैनिकांनीं आम्ही कधीही साथ सोडणार नाही, सदैव साहेबांसोबत आहोत, अशी ग्वाही दिली.
































































