तीन सहकाऱ्यांवर गोळ्या झाडून जवानाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात इंडो-तिबेटन सीमा पोलिसांच्या (आयटीबीटी) जवानाने आपल्या तीन सहकाऱ्यांवर गोळय़ा झाडल्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज घडली. उधमपूच्या देविका घाट कम्युनिटी सेंटरमध्ये दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली. आयटीबीटीचा कॉन्स्टेबल भूपेंद्र सिंग याने त्याच्याबरोबर कर्तव्यावर असलेले एक हेड कॉन्स्टेबल आणि दोन कॉन्स्टेबल्सवर आपल्या सर्व्हिस रायफलने गोळीबार केला. त्यात तिघेही जखमी झाले. त्यानंतर भूपेंद्रने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. तिघा जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.