
सामना प्रतिनिधी । नागपूर
नगरमधील उपशहरप्रमुख यांच्या हत्येप्रकरणाच्या खटल्यासाठी अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली असून मालाडमधील शिवसेना माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी अॅड. राजा ठाकरे यांची नियुक्ती केली जाईल, अशी घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या प्रकरणात आरोपींना प्रसंगी मोक्काही लावला जाईल असे अश्वासन मुख्यमंत्र्यांनी आज शिवसेनेने उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर बेलताना दिले.
शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी नगरमधील शाहूनगर भागातील उपशहरप्रमुख यांची ७ एप्रिल रोजी झालेली हत्या. त्याचप्रमाणे मालाडच्या उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांच्या झालेल्या हत्येची लक्षवेधी उपस्थित केली. शाहूनगर उपशहरप्रमुखाच्या हत्येप्रकरणी अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली जावी अशी मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी या खटल्यासाठी अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती निश्चित करण्यात आली असल्याची माहिती सभागृहाला दिली.
संघटित गुन्हेगारीचा कट – सुनील प्रभू
शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या हा एक संघटित गुन्हेगारीचा कट होता. त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाच्या खटल्यासाठी अॅड. राजा ठाकरे यांची नियुक्ती करण्यात यावी. त्याचप्रमाणे त्यांची हत्या करणाऱयांविरुद्ध मोक्का लावण्याची मागणी सुनील प्रभू यांनी केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी प्रसंगी संबंधित आरोपींना मोक्का लावला जाईल. त्याचप्रमाणे या खटल्यासाठी ऍड. राजा ठाकरे यांची नियुक्ती करण्यात येईल अशी माहिती दिली.



























































