रनआऊटनंतर ट्रोल होणाऱ्या गप्टिलच्या पायाला आहेत दोनच बोटं, तरीही …

107

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रविवारी झालेल्या ड्रीम फायनलमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करत विश्वविजेतेपद पटकावले. सुपर ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना गप्टिल धावबाद झाला. यानंतर तो मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला. सेमी फायनलमध्ये गप्टिलच्या एका अचूक थ्रो मुळे धोनी रनआऊट झाला होता आणि फायनलमध्ये कर्माने गप्टिलही बाद झाला असे त्याला ट्रोल करण्यात येत आहे. परंतु ट्रोल करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की गप्टिलच्या डाव्या पायाला फक्त दोनच बोटं आहेत आणि तरीही तो न्यूझीलंडचा सर्वोत्तम फलंदाज आणि क्षेत्ररक्षक आहे.

मुलांनो क्रीडा क्षेत्रात चुकूनही येऊ नका; त्यापेक्षा आचारी बना, आनंदी जगा!

इंग्लंडची “हॅटट्रीक”, तिन्ही खेळांचा वर्ल्डकप जिंकणारा ठरला पहिला देश

होय, हे खरे आहे. मार्टिन गप्टिल याच्या डाव्या पायाला फक्त दोनच बोटं आहेत. पायाला बोटं नसताना धावणे किती अशक्य असते हे सर्वांना माहिती आहे. असे असतानाही गप्टिलने आपला सर्वोत्तम खेळ केला. सुपर ओव्हरमध्येही गप्टिल दोन वेळा दोन-दोन धावा काढण्यासाठी पळाला, परंतु अखेरच्या चेंडूवर तो धावबाद झाला. यानंतर लोक त्याला ट्रोल करू लागले. परंतु नेटिझन्सने ट्रोलर्सची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

लहानपणी गमावली बोटं
मार्टिन गप्टिल 13 वर्षाचा असताना लिफ्टमध्ये त्याचा पाय अडकला होता. डॉक्टरांनी त्याची बोटं वाचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु यामुळे त्याला जीवही गमवावा लागेल हे ओळखून त्यांनी तीन बोटं कापण्याचा निर्णय घेतला. पायाला दोनच बोटं असल्याने मार्टिनला धावण्यात अडथळा येत होता. परंतु या सर्वांवर मात करत त्याने न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवले. संघातील खेळाडू त्याला ‘मार्टी टू टोज’ या टोपन नावानेही हाका मारतात.

आपली प्रतिक्रिया द्या