दिग्विजय सिंह म्हणाले मला दहशतवादी घोषित करा, गृहमंत्री शाह यांनी दिले उत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दहशतवादाला आळा घालण्यासाठी राज्यसभेत युएपीए हे विधेयक सादर करण्यात आले होते. शुक्रवारी चर्चेनंतर हे पारित करण्यात आले. चर्चेदरम्यान काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध केला होता.

दहशतवादावर भाजपचे धोरण हे बोटचेपेपणाचे आहे असा आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केला. त्यावर  अमित शहा म्हणाले की, “दिग्विजय सिंह मला म्हणाताहेत की ‘त्यांना दहशतवादी घोषित करा.’ तुमचा राग योग्य आहे. कारण तुम्ही आताच निवडणूक हरला आहात. परंतु तुम्ही जर काहीच केले नसेल तर तुम्हाला काहीच होणार नाही याचे मी आश्वासन देतो.”

दिग्विजय सिंह म्हणाले की “आम्हाला भाजपच्या दहशतवादीविरोधी धोरणावर विश्वास नाही. काँग्रेसने दहशतवाच्या मुद्द्यावर कधीच निष्काळजीपणा दाखवला नाही म्हणून या कायदा आम्ही आणला होता. हे दहशतवादाविरोधातील  भाजपचे धोरण हे बोटचेपेपणाचे आहे.” भाजप सरकारनेच रुबैय्या सईद आणि मसूद अझर या दहशतवद्यांना सोडले होते असेही सिंह यांनी म्हटले.

नवीन कायद्याच्या तरतुदीनुसार पुढील चार आधारावर दहशतवादी घोषित होणार

  • जी व्यक्ती दहशतवादी कारयावा करणार
  • जी व्यक्ती दहशतवादी कारवाईची तयारी करणार
  • जी व्यक्ती दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी काम करणार
  • आणि जी व्यक्ती कुठल्याही प्रकारे दहसशतवादाशी निगडीत असणार