अप्पर ठाणे क्रिकेट अ‍ॅकॅडमीचे उद्घाटन

प्रतिभावान उदयोन्मुख क्रिकेटपटूंची क्षमता ओळखून त्यांना दर्जेदार क्रिकेटचे प्रशिक्षण मिळावे म्हणून लोढा रिअल इस्टेटच्या वतीने अप्पर ठाणे क्रिकेट अकादमीचे नुकतेच माजी कसोटीपटू संजय मांजरेकरच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

अप्पर ठाणे लोढा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पूर्ण आकाराची खेळपट्टी असलेले क्रिकेट मैदान तयार करण्यात आले असून या अकादमीमार्फत मुलांना आज जगात उपलब्ध असलेले सर्वोत्तम प्रशिक्षण दिले जाणार आहे. या अकादमीमध्ये फुटबॉल मैदान, टेनिस कोर्ट आणि बास्केटबॉल कोर्टही असून त्यात नावीन्यपूर्ण प्रशिक्षण उपक्रमाचा समावेश करण्यात आला आहे.

अप्पर ठाणे येथील क्रिकेट अ‍ॅकॅडमी 200 एकर जागेवर पसरलेली आहे. 80 टक्क्यांहून अधिक जागा खुली आहे आणि हजारो झाडे व शुद्ध हवेचा अनुभव मिळण्यासोबत 50,000 चौरस फुटांचे भव्य क्लबहाऊस आहे, ज्यामध्ये उत्साहवर्धक पोहण्याचा आनंद घेण्यासाठी स्विमिंग पूल आहे.