यूपीएससी परीक्षा 4 ऑक्टोबरलाच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार 4 ऑक्टोबर रोजीच घेण्यात येईल. या तारखेत कोणताही बदल केला जाणार नाही, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी करणारी याचिका सुनावणीत फेटाळून लावली. कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करून पेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा लांबणीवर टाकाव्यात अशी मागणी एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. यासंदर्भात झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने यूपीएससीने परीक्षेच्या वेळी आरोग्यविषयक घेण्यात येणाऱ्या खबरदारीबाबत सविस्तर माहिती सादर केल्याचे स्पष्ट करत परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी फेटाळून लावली.