
सामना प्रतिनिधी । उरण
पंधरा वर्षे सत्तेत असताना काँग्रेस-राष्ट्रवादीने कोणतीही विकासकामे केली नाहीत, ते आता काय विकास करणार? या नेत्यांनी फक्त घोटाळे आणि घोटाळेच केले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या अलिबाबा चाळीस चोरांना कायमचे घरी बसवा, असे आवाहन शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे उमदेवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी शाळेच्या प्रांगणात प्रचारसभा झाली.
































































