
सामना प्रतिनिधी, पैठण
पैठण शहरातील दहीहंडी उत्सवाला जोरदार प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विलास भुमरे यांनी प्रायोजित केलेल्या या सोहळय़ात बिडकीनच्या गोविंदा पथकाने बाजी मारत 22 हजार 222 रुपयांचे बक्षीस पटकावले. प्रसिद्ध सिनेअभिनेत्री ऊर्मिला कानिटकर-कोठारे यांची खास उपस्थिती पैठणकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
पैठण शहरात विविध सांस्पृतिक उपक्रम राबवणाऱया प्रारब्ध फाऊंडेशनने या दहीहंडी उत्सवासाठी पुढाकार घेतला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. आमदार संदिपान भुमरे यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे सभापती विलास भुमरे यांनी या कालाहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. प्रसिद्ध सिनेअभिनेत्री ऊर्मिला कानिटकर-कोठारे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाचे आकर्षण ठरली. प्रारब्ध फाऊंडेशनतर्फे आयोजित या सोहळ्यासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रारब्ध फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे उपशहरप्रमुख शिवराज पारीख यांनी या कार्यक्रमाचे उत्पृष्ट नियोजन केले. गोविंदा पथकाच्या एपूण 9 संघांनी या उत्सवात सहभाग घेतला. गोदावरी नदीकाठावर असलेल्या पंडित गागाभट्ट चौकात भव्य शामियाना उभारण्यात आला होता. सायंकाळी 6 वाजता सुरू झालेला हा कालाहंडीचा सोहळा रात्री 10 वाजेपर्यंत चालला. डीजे व पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात मोठय़ा उत्साहात हा उत्सव पार पडला. शहरात पहिल्यांदाच या सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. त्यातच सिनेअभिनेत्री ऊर्मिला कानिटकर-कोठारी यांची उपस्थिती लाभल्यामुळे कार्यक्रमात मोठी रंगत आल्याचे पाहायला मिळाले.
सिनेअभिनेत्री ऊर्मिला कानिटकर यांचे स्वागत वर्षा विलास भुमरे, स्वाती तुषार पाटील, पूजा शिवराज पारीख व शिवसेना नगरसेविका शोभा संतोष सक्वाशे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य आयोजक प्रारब्ध फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवराज रामभाऊ पारीख यांनी सूत्रसंचालन केले.
दहीहंडी पह्डणाऱया बिडकीन येथील विजयी गोविंदा पथकास प्रथम बक्षीस 22 हजार 222 रुपये (पैठण, नगर परिषद शिवसेना गटनेते तुषार सूर्यभान पाटील व नगरसेवक भूषण कावसानकर यांच्यातर्फे) देण्यात आले. तर सलामी देणाऱया गोविंदा पथकास 5 हजार 1 रुपये बक्षीस दिले.
उत्सव यशस्वी करण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, दूध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, तालुकाप्रमुख अण्णासाहेब लबडे, नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे, न.प. शिवसेना गटनेते तुषार सूर्यभान पाटील यांनी नियोजन केले. महेश लोळगे, प्रसाद सेवनकर, अनुप मालपाणी, सोनू जोजारे, अशोक वाघ, बाळा जगताप, पृष्णा तावरे, सूर्यकांत गोरे, संग्राम देशमुख, प्रसाद शेवनकर, नामदेव खराद, धीरज बचाटे, अमोल सपकाळ, मनोज देशमुख, मनीष औटी, मनोज परदेशी, अक्षय सपकाळ, अस्लम पठाण, अमोल पुलकर्णी, संतोष पुलकर्णी, यश राजपूत, ऋषी तांबटकर, योगराज बुंदिले, आशिष दहिवाल, योगेश हर्षीकर, मधुसूदन मुंदडा, शिवाजी पठाडे, सोनू जोजारे, रवी गरड, संदेश मुथा, निखिल काळे, हरीश सारडा, मनोज वीर, रोहित चौहान, आशिष नवगावकर व पृष्णा तावरे यांनी परिश्रम घेतले.





























































