Lok Sabha 2019 उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबईतून निवडणूक लढवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
urmila-matondkar

सामना ऑनलाईन । मुंबई

काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. उर्मिला यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. सध्या या मतदार संघात भाजपचे गोपाल शेट्टी हे विद्यमान खासदार असून त्यांना भाजपने पुन्हा तिकीट दिले आहे. त्यामुळे गोपाल शेट्टी विरुद्ध उर्मिला मातोंडकर अशी लढाई रंगणार आहे. उर्मिला यांना उमेदवारी दिल्याने तेथून इच्छुक असलेल्या माजी खासदार संजय निरुपम यांचा पत्ता कट झाला आहे.

काँग्रेसचे उर्मिलाला ‘याई रे… याई रे…’ उत्तर मुंबईतून तिकिटाची ऑफर?

उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी 2009 मध्ये भाजपचे तत्कालीन उमेदवार राम नाईक यांचा पराभव करत विजय मिळवला होता. मात्र 2014 मध्ये गोपाळ शेट्टी यांनी संजय निरुपम यांना 4 लाखाहून अधिक मतांच्या फरकाने पराभूत केले होते. हा पराभव काँग्रेससाठी लाजिरवाणा पराभव ठरला होता. तरी देखील संजय निरुपम हे निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होते. मात्र पक्षाने उर्मिला यांना तिकीट दिल्याने निरुपम यांचा पत्ता कापला गेला आहे.