
देसी गर्ल प्रियंका आणि नीक जोन्स यांच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. सध्या हे दोघे या छोट्या पाहुण्याचे कौतुक करण्यात इतके दंग झाले आहेत कि त्यांचा दिवस या छोट्या पाहुण्याबरोबर खेळताना उगवतो आणि मावळतोही. प्रियंकाने सोशल मीडियावर या इटुकल्या पिटुकल्या पाहुण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
हा छोटा पाहुणा दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचा कुत्रा जीनो जोन्स आहे. जीनोचा निकबरोबर मस्ती करतानाचा व्हिडीओ प्रियंकाने शेअर केला आहे. त्याखाली तिने सेम फ्रेममध्ये गोड व्यक्ती असं लिहलं आहे. प्रियंका आणि जोन्स यांना प्राण्यांची आवड असून त्यांच्याकडे डायना नावाची एक कुत्री देखील आहे.

























































