
पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत युएस ओपनमधील विजेत्या राजीव राम व जॉय सेलिसबरी व चार हिंदुस्थानी खेळाडूंनी पुरूष दुहेरीत सहभाग नोंदवला आहे. याशिवाय गतविजेती जोडी रोहन बोपण्णा व रामुकमार रामनाथन यांनी देखील आपला सहभाग नोंदवला आहे. दक्षिण आशियातील एकमेव एटीपी 250 स्पर्धा 31 डिसेंबर 2022 ते 7 जानेवारी 2023 या कालावधीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, बालेवाडी येथे होणार आहे.
पुरुष दुहेरीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या राम व चौथ्या स्थानी असलेल्या सेलिसबरी ही जोडी टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत सहभागी झाली आहे. तीनवेळा ग्रँड स्लॅम स्पर्धेत विजेतेपद पटकवणाऱ्या या अमेरिका व ब्रिटिश जोडीचा 2022मधील मौसम यशस्वी ठरला आहे. या जोडीने सलग दुसऱ्यांदा यूएस ओपन स्पर्धेत विजेतेपद पटकावले आणि याशिवाय तुरीन मध्ये एटपी मास्टर्स 1000स्पर्धेत विजेतेपद मिळवून वर्षाचा शेवट गोड केला.
दरम्यान, स्पर्धेत थेट प्रवेश मिळवणाऱ्या इतर मानांकित खेळाडूंमध्ये नॅथॅनियल लॅमन्स आणि जॅक्सन विरो या अमेरिकन जोडीचा समावेश आहे, ज्यांनी सॅन डिएगो येथे 2022 च्या सदर्न कॅलिफोर्निया ओपनमध्ये एकत्रितपणे प्रथम एटीपी टूर दुहेरीचे विजेतेपद जिंकले आणि सॅडिओ डुम्बिया आणि फॅबियन रेबोल या फ्रेंच जोडीचा समावेश आहे. याशिवाय माजी जागतिक नंबर-24 सँडर गिल आणि माजी जागतिक नंबर-28 जोरान वेलिगेन यांनी देखील 121 च्या एकत्रित क्रमवारीत कपात केली आहे.
टाटा ओपन महाराष्ट्र ही स्पर्धा आयएमजीच्या मालकीच्या आणि राईज वर्ल्डवाईड यांचे व्यवस्थापन लाभले असुन महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेला टाटा मोटर्सने प्रायोजित केले आहे. गतवर्षी विजेतेपद पटकावणारे बोपण्णा आणि रामकुमार यावर्षी दुसऱ्या जोडीदाराबरोबर खेळणार आहे. दोन वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या बोपण्णा यावर्षी डचमन बॉटिक व्हॅन डी झांडस्चुल्प सोबत सहभागी होणार आहे.
साकेथ मायनेनी आणि युकी भांबरी हे दुहेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये सहभागी होणारे अन्य दोन हिंदुस्थानी खेळाडू आहेत. मायनेनी आणि भांबरी यांनी 2022 मध्ये एटीपी चॅलेंजर टूरमध्ये एकत्र खेळून सहा विजेतेपद पटकावले आहेत. माजी यूएस ओपन चॅम्पियन मारिन सिलिक आणि गेल्या आवृत्तीचा उपविजेता एमिल रुसवुरी हे एकेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश करतील, ज्यामध्ये 17 टॉप-100 खेळाडू आहेत. पात्रता फेरीचे सामने 31 डिसेंबरपासून सुरू होणार असुन तर मुख्य ड्रॉ 2 ते 7 जानेवारी दरम्यान खेळवला जाईल.


























































