फाईव्ह स्टार हॉटेलात राडा, टेरेसवरून ढकलले

किरकोळ वादानंतर एका व्यापाऱ्याने मागचा पुढचा विचार न करता मुलाच्या मित्राला फाईव्ह स्टार हॉटेलच्या टेरेसवरून ढकलून दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेली येथील आहे. सर्वात संतापजनक म्हणजे एका व्यक्तीला टेरेसवरून ढकलल्यानंतर या व्यापाऱयाने दुसऱया एका व्यक्तीलादेखील टेरेसवरून ढकलून देण्याचा प्रयत्न केला.

एका प्री-वेडिंग पार्टीसाठी पीडित तरुण आपल्या मित्रांसोबत हॉटेलमध्ये आला होता. पीडित व्यक्तीचे नाव सार्थक अग्रवाल आहे. तो हेल्थ सेक्टरमधील व्यावसायिक आहे. त्याच्यासोबत रिधिम अरोरा हादेखील होता. रिधिम अरोरा याचे वडील संजीव अरोरा यांनीच सार्थकला टेरेसवरून ढकलून दिले.

हॉटेलमध्ये मित्रांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले. भांडणानंतर रिधिम याने आपले वडील संजीव अरोरा यांना पह्न केला. त्यानंतर संजीव अरोराने हॉटेलमध्ये पोहोचून सार्थकला मारहाण केली व टेरेसवरून ढकलून दिले. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये पैद झाला आहे. पीडित सार्थक याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती नाजूक आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.