अंत्यसंस्काराची तयारी केली आणि तो समोर उभा ठाकला, जाणून घ्या काय आहे घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशात हरदोई जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. जिथे घरातील एका तरुणाचा मृत्यू झाला होता आणि कुटुंब त्याच्या अंत्यविधीची तयारी करत असताच अचानक तरुण जीवंत झाला. या घटनेने सगळेच चक्रावले.

उत्तर प्रदेशात हरदोई येथील संदीप नावाचा एक तरुण बेपत्ता होता. दरम्यान एका रेल्वे ट्रॅकवर एक मृतदेह सापडला. तो आपला भाऊ संदीप असल्याची ओळख त्याच्या भावाने पटवली. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह घरी पोहोचवला आणि त्यावर अंत्यविधी करण्याची तयारी सुरु होती.

ज्यावेळी संदीपच्या भावाने नातेवाईकांना संदीपच्या मृत्यूबाबत कळवले त्यावेळी वेगळीच गोष्ट समजली. ज्या भावाला मृत मानून अंत्यविधी करत होते तो भाऊ एका नातेवाईकांकडे असल्याचे कळले. तरुण जिवंत असल्याचे कळले. तरुण जीवंत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबाच्या आनंदाला पारावर उरला नाही.

मृताच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, संदीपचे एक बोट लांब होते आणि शवघरात असलेल्या मृतदेहाचे बोटही लांब होते. त्यामुळे तो आपलाच भाऊ असल्याचे समजला. ओळख पटल्यावर मृतदेहाच शवविच्छेदन करुन घरी नेण्यात आले. पण आता भाऊ जीवंत असल्याचे कळल्यावर भलताच मृतदेह घरी आणल्याने त्याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह पुन्हा ताब्यात घेतला आणि ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहेत.