लाखो रुपये बघून चोराला आला हार्ट अटॅक!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चोरीच्या घटनांबाबत आपण आजवर अनेकदा ऐकले आहे, पण लाखो रुपये बघून चोरालाच हार्ट अटॅक आल्याचा अजब प्रकार नुकताच उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे घडला आहे. हजार रुपये मिळवण्यासाठी दोन चोरांनी चोरी केली, परंतु अपेक्षेपेक्षा जास्त मिळालेली रक्कम बघून त्यांच्यातील एकाला हार्ट अटॅक आला. शेवटी याच रकमेतील अर्ध्याहून अधिक रक्कम उपचारासाठी वापरायची वेळ त्यांच्यावर आली.

फेब्रुवारी महिन्यात हैदर पब्लिक सर्व्हिस सेंटरमध्ये लाखो रुपयांची चोरी झाल्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली. संशयावरून पोलिसांनी नौशाद नावाच्या चोराला अटक केली. त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला आहे. चोरी केल्यानंतर पैशाने भरलेली बॅग घेऊन नौशाद आणि एजाज हे दोन चोर घरी पोहोचले. तिथे एवढी मोठी रक्कम पाहून एजाजला हृदयविकाराचा झटका आला. नौशादने त्याला रुग्णालयात दाखल केले. तिथे तीन दिवस त्याच्यावर उपचार करण्यात आले ज्यात चोरीचे साधारण दोन लाख रुपये खर्च झाले. या दोघांनीही चोरीची कबुली दिल्याचे पोलीसांनी सांगितले.