मांसाहारी जेवण पाठवल्याने झोमॅटो, स्विगीला नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मांसाहारी पदार्थांवर बंदी घालण्यात आलेल्या हरिद्वारमधील परिसरात मांसाहारी जेवण पाठवल्याप्रकरणी ‘झोमॅटो’ आणि ‘स्विगी’ या कंपन्यांना उत्तराखंड सरकारच्या अन्न आणि सुरक्षा विभागाने नोटीस बजावली आहे. याप्रकरणी दोन्ही कंपन्यांकडून उत्तर मागवण्यात आले आहे.

हरिद्वारच्या जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. हरिद्वार महापालिकेने शहराच्या हद्दीत मांसाहारी अन्नपदार्थांच्या विक्रीकर बंदी घातली असताना त्यांची डिलीव्हरी होत असल्याची स्थानिकांनी तक्रार केली होती.